एआय युगातील मराठी कोडिंगचे नवे क्षितिज

0

21व्या शतकातील आभासी जग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व केवळ भाषांतरापुरते मर्यादित न ठेवता, ती कोडिंग आणि तंत्रज्ञानाची मूळ भाषा बनणे आवश्यक आहे. अ‍ॅलन ट्युरिंगपासून सुरू झालेला हा तांत्रिक प्रवास समजून घेत, भविष्यात मातृभाषेतून स्वतंत्र संगणकीय प्रणाली आणि प्राज्ञापन (झीेसीरााळपस) विकसित केल्यास मराठी खर्‍या अर्थाने जागतिक स्पर्धेत टिकून राहील.
…………………………

– अर्णव सुधा सतीश

21व्या शतकाची पावशतकी वाटचाल आपण पूर्ण केलेली आहे आणि आता त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण दाखल झालेलो आहोत. नुकताच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जादेखील मिळालेला आहे, ह्याने मराठी अभिजात झालीय का? की मराठी आधीपासूनच अभिजात होती, तिला आता कुठे तरी ते मानांकन मिळालं म्हणून अभिजात भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे का? असो मूळ मुद्दा हा नाही. पण सुरुवातीलाच हा प्रश्न का विचारला ह्याचं कारण लेखाच्या शेवटी वाचकाच्या पदरी पडेल अशी खात्री देतो.

2020 साली कोव्हीड-19 ह्या संसर्गाने संबंध मानवजातीला उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात नेले. म्हणजेच काय 2020 नंतर एका नवीन फॅडचा जन्म झाला, आभासी जगाचा. शुद्ध मराठीत त्याला ‘व्हर्च्युअल’ म्हणतात. कारण ऑनलाइन सभा घेणं, (बैठका घेणं) सुरू होतंच पण कोव्हीडकाळापासून ह्याचं प्रमाण फार वाढलं. हातातले सांगाती म्हणजेच (भ्रमणध्वनी) सगळी कामं अधिक चपळाईने करत होते आणि आम्ही अधिकाधिक सुस्त होत चाललो होतो. ह्याच दरम्यान आलं फॅड ते ‘एआय’चं अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं. अर्थात यंत्रांची क्रांती झालेली होती, संगणकापासून गणांकापर्यंत आणि नोकियापासून आयफोनपर्यंतचा आपला प्रवासही झालेला होता, पण त्यात भर पडली ह्या नव्या साहाय्यकाची शुद्ध मराठीत असिस्टंटची, ज्याचं नाव ए.आय.

गुगल हे एक सर्च इंजिन किंवा शोधाचा यंत्र आपण वापरत होतो, त्याआधी याहू होतं, मायक्रोसॉफ्टचं बिंग होतं, बायडू होतं, इत्यादी अजूनही चलनात आहेत. गुगलने ही शर्यत जिंकली असं म्हणायलाही हरकत नसावी पण तरी चीनसारख्या काही इतर देशात गुगल मर्यादित स्वरूपातच वापरलं जातंय. ह्याबाबतीत चीनचे धोरण हे कोणतीही जाहिरात न करता आपल्यापेक्षा जास्त स्वदेशी राहिलंय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही! पण विकिपीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तीच माहिती जर मला चुटकीसरशी चॅट जीपीटी देत असेल तर तो मी का वापरू नये? माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हा देतो, मोठमोठ्ठाली गणितं सोडवतो, अगदी विद्यावाचस्पती होण्याची ज्याची कुवत आहे तो मला मदत करीलच की, ह्यात मी सगळं गुगळायचंच कशाला? (गुगल का करायचं?) हे ही प्रश्न आम्हाला पडू लागले. आपल्यासाठी एक आपल्या हक्काचं यंत्र आलं जे आपली सगळी कामं करू शकेल आणि आपण ते वापरू लागलो. पण हे यंत्र खरंच विचार करतं का? की हे निव्वळ भासवणं आहे? काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता/प्रज्ञा? काय आहे चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर? (सर्जन-संवाद) खरंच मानवापेक्षा यंत्र जास्त हुशार झाली आहेत का? ही कोणती जादू आहे की आतमध्ये माणूसच बसवलेला असतो? काय आहे ह्या तंत्रज्ञानामागचं गूढ? आणि हे मराठीत कितपत शक्य आहे? अशा अनेक प्रश्नांचा आढावा ह्या विस्तीर्ण लळिताच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण अगदीच आत्ताच्या कृबुवर (आपण एआयला कृबु म्हणूयात.) उडी मारण्याआधी ह्या उेवळपस अर्थात संकेतन म्हणजे काय? संकेतनाची व्याख्या काय? झीेसीरााळपस म्हणजेच प्राज्ञापन म्हणजे काय? उेवळपसमध्ये उेाळिश्रशी (परिवर्तक) म्हणजे काय? ह्या अगदी महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी पहिले समजून घेऊयात. ज्यांना ह्या गोष्टी ठाऊक आहेत त्यांनीही आवर्जून वाचाव्यात (लेखक ह्या विषयातील तज्ज्ञ नाही, त्यामुळे लेखकाची चूक दाखवण्याची इथे उत्तम संधी वाचकाला आहे.)

उेवळपस संकेतन म्हणजे काय?
एका विशिष्ट माहितीला एका विशिष्ट भाषेतल्या चिन्हात, अंकात, किंवा अक्षरात गुंफून एका नव्या भाषेची/लिपीची संरचना करणे म्हणजे उेवळपस किंवा संकेतन करणे म्हणूयात. अगदीच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला सकाळ झाली हे कसं समजतं? बाहेर झुंजुमुंजु झालं, उजेड पडला, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला की लक्षात येतं आता सकाळ झाली. उजेड पडणं, पक्ष्यांचा आवाज त्या विशिष्ट वेळी होणं हा एक संकेत आहे. मानवी भाषासुद्धा संकेतनच आहे, पण आपण ते इतक्या सहजगत्या करतो की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. इतर प्राण्यांसारखी आपल्याला भाषा ही उपजत नसते, आपल्याला ती शिकावी लागते. तसंच संकेतनात सुद्धा ह्या भाषा शिकाव्या लागतात. संगणकाच्या संकेतनाच्या भाषा ह्या उ++, गर्रींर, झूींहेप, AऊA, Aडउखख, र्ठीलू, उ झरीलरश्र अशा अनेक भाषा आहेत.

झीेसीरााळपस (प्राज्ञापन) म्हणजे काय?

झीेसीरााळपससाठी ‘प्राज्ञापन’ हा शब्द स. ग. काजरेकर ह्यांनी तयार केलेला आहे. त्यांच्या ‘अंकीय संगणकाचा परिचय’ ह्या पुस्तकाचा हा लेख लिहितांना खूप वापर झाला, त्यात बरेच मराठी पर्यायी शब्द आढळतात. माहिती म्हणा, विदा म्हणा किंवा त्याचे मूळ नाव ऊरींर, हा कसा असला पाहिजे, कसा दिला पाहिजे, तुमच्या संकेतस्थळाची (ुशलीळींश), अनुप्रयोगाची ( रिि.), प्रातिभासिक खेळाची (सराश), संगणकाची, भ्रमणध्वनीची वर्तणूक कशी असावी हे तुम्ही कसे प्राज्ञापन करता ह्यावर अवलंबून असतं. थोडक्यात काय तर, तुम्ही व्हॉटसअ‍ॅप उघडलात की पटलावर ( ीलीशशप )वर तुम्हाला त्याचं चिन्ह दिसतं, मग चॅट्स, स्टेटस, कॉल्स असे रकाने आढळतात, तुम्ही ते डावीकडे सरकवल्यावर स्टेट्सचा रकाना उघडतो, वरील तीन बिंदू दाबले की निश्चितिका म्हणजेच सेटींग्ज पाहता येतात, हे सगळं त्या अनुप्रयोगाच्या प्राज्ञापनामुळे घडतं आणि संकेतनातून प्राज्ञापन शक्य होतं. ह्यासाठी त्या-त्या विशिष्ट भाषेचा एक डूपींरु असतो, अर्थात त्या भाषेची रचना. ती भाषा जिथे वापरता येते ते उेवळपस झश्ररींषेीाी असतात म्हणजे संकेतन स्थळ, जिथे तुम्ही संकेतन करू शकता. ही संकेतन प्रक्रिया कशी केली जाते त्याच्या खोलात इथे जाणार नाही, पण ही भाषा तर्काच्या आधारावर चालते हा महत्त्वाचा मुद्दा इथे सांगणं गरजेचं आहे. संकेतन करत असताना तुम्हाला त्याला विविध, आज्ञावल्या (उेाारपवी) द्याव्या लागतात. एखादं सॉफ्टवेअर कसं काम करेल. त्याची रचना कशी असावी, ते कसं दिसावं, त्यातून विदा कसा काढता यावा, विदा कसा वाचता यावा ह्या सर्वांसाठी संकेतकाने म्हणजेच (उेवशी)ने स्वत:ची भूमिका जबाबदारीने बजावणं गरजेचं असतं, उेवळपस करताना अर्थात त्या कढचङ र्ींळशुशी (कूशिीींशुीं चरीर्ज्ञीि ङरपर्सीरसश) दचङ र्ींळशुशी (एुींशपीळलश्रश चरीर्ज्ञीि ङरपर्सीरसश), उडड (उरीलरवळपस डींूश्रश ीहशशींी) अशा भाषांचा वापर पाहून, शिकून करता येतो. अगदी जी मंडळी इ-अनुदिनी लिहितात, ब्लॉगलेखन करतात ती मंडळीदेखील कढचङ र्ींळशुशीने स्वत:च्या ब्लॉगच्या पानाचे कसे संकेतन झालेले आहे ते पाहू शकतात. हे संकेत (लेवश) इतक्या नकळतपणे आपल्याकडून वापरले जात असतात की आपल्याला पत्ताही लागत नाही. अगदी पैसे देतांना आपण जो चाळतो तो टठ म्हणजेच त्वरीत प्रतिसाद उेवश/संकेत सुद्धा त्याचंच उदाहरण आहे आणि संकेतनाचा हा सगळा भाग सॉफ्टवेअर ह्या संगणकशास्त्रीय शाखेत मोडतो, शुद्ध मराठीत र्उेािीींशी डलळशपलश करणारे अगदी मूलभूत पाया पक्का करण्यासाठी हे शिकतात.

आपल्या सगळ्यांना संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला हे माहिती आहे. तो पहिला ‘संगणक’ हा त्याच्या नावानुसारच कार्य करायचा. म्हणजेच संगणकाचा शोध हा ‘गणना’साठी झाला होता. शुद्ध इंग्रजीत उरश्रर्लीश्ररींळेपसाठी, तेव्हा ह्याला Aपरश्रूींळलरश्र एपसळपश किंवा ‘विश्लेषक यंत्र’ म्हंटलं जायचं आणि ह्याचं काम काठिण्य पातळीची गणितं सोडवणं हे होतं. संगणक जो आज इतका सुंदर होऊन आज आपल्या पुढे आलाय ह्यात अनेकांचं योगदान आहे, त्यात अगदी स्टीव्ह जॉब्ससारख्या मंडळींचा मोलाचा वाटा राहिलाय, त्यांनी तो संगणक अधिक सुंदर केला. पण हा पहिला संगणक काही आजच्या संगणकासारखा जंगम (झेीींरलश्रश) स्वरूपाचा नव्हता आणि ह्याची पहिली ‘कोडर संकेतनिका’ असण्याचा मान एका महिलेला दिला जातो, ती म्हणजे ऑगस्टा डालव्हलेस. इंग्रजी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी बायरनची लेक ही, बॅबेजची चांगली मैत्रीण. इंग्लंडात बायकांनी पुस्तकं वाचणं तर सोडाच, ‘ब्र’ शब्द काढणंही जेव्हां कठिण होतं, त्यावेळी ह्या स्त्रीनं गणितज्ञ बर्नौलीच्या सिद्धांतांवर आणि सूत्रांवर त्या गणांकाने काय काम करावं ह्याचं प्राज्ञापन केलं.

बॅबेजने स्वत: ह्याचं श्रेय दिल्याची नोंद आढळत नाही आणि आत्ताची बरीच मंडळीही हे प्राज्ञापन बॅबेजने आधीच करून ठेवलं होतं असं म्हणतात! तरीही, त्यावेळी एका स्त्रीनं केलेली ही अखंड स्त्रीजातीसाठी मुलुखावेगळी अभिमानास्पद कामगिरीच करून दाखवली हे मानलं पाहिजे. पण, अ‍ॅडाच्या कामगिरीचं कौतुक म्हणून की काय आज एक अक्खी भाषाच ‘AऊA’च्या नावावर आहे, अशी इतिहासात आज तिची नोंद सापडल्याशिवाय रहात नाही. बॅबेजचं विश्लेषक यंत्र कालौघात बदलत राहिलं असलं तरी संकेतनाच्या जगात दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी युद्धाच्या दरम्यान फौजेशी संपर्क साधण्यासाठी ुळीशश्रशीी अर्थात, बिनतारी संदेशन केलं जात असे. आपला संदेश इतर कुणालाही कळू नये, तो गुप्त राहावा या हेतूने हिटलर संदेशनासाठी स्क्रीबस्- निर्मित ‘एनिग्मा कोड’ ह्या नावाचे संकेतन वापरत होता. एनिग्मा काही पहिलेवहिले संदेशन नव्हते. मरे संकेत, बॉडट संकेत अशा वेगवेगळ्या संकेतनव्यवस्था त्यावेळी उपलब्ध होत्या. तेव्हा एक माणूस हिटलर जो संदेशनासाठी (र्उेााीपळलरींळेप)साठी वापरत असलेला, ‘एनिग्मा कोड’ तोडण्याच्या कामावर होता. त्या माणसाचं नाव होतं, लन ट्युरिंग. एक हुषार गणितज्ञ. वास्तविक एनिग्माला तोडण्याचे काम मानवी पातळीवर करायचे कर्मकठीण काम होते, पण अ‍ॅलनने इथे जो क्रांतिकारी विचार मांडला त्यासाठी तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा पितामह मानला जातो. अ‍ॅलनच्या मते हे काम एका गणन यंत्राकडून झाले तर अधिक लवकर संकेताची उकल करता येऊ शकत होती. म्हणून त्याने, केवळ तो संकेत शोधण्यासाठी एक अख्खं यंत्र तयार केलं. अ‍ॅलन पहिला विचारवंत होता ज्याने ‘जर यंत्राला मानवासारखा विचार करता आला तर…’ ही कल्पना मांडली. पण अ‍ॅलन स्वत: हे जाणत होता व त्याने नंतर हे कबूल केले आहे की, ‘यंत्र हे केवळ शक्यता नोंदवू शकते’ जशी माणसं वर्तवतात. अ‍ॅलनची ही गोष्ट सांगण्यामागचे कारण हेच की आजचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान एका विचार करू शकणार्‍या यंत्राचे तंत्रज्ञान नसून मानवी बुद्धी जितक्या शक्यता, शुद्ध मराठीत झीेलरलळश्रळींळशी वर्तवू शकते तितक्याच शक्यता वर्तवू शकणारे तंत्रज्ञान आहे. तुम्ही दिलेल्या विदेची वरींरची उजळणी करणारे तंत्रज्ञान आहे. अ‍ॅलनवर नुकताच 2025 साली एक चित्रपट आला, तोही ह्याच विषयासंबंधी, ह्याचे जे नाव आहे, तीच कृत्रिम बुद्धिमत्तेची अगदी सोप्पी व्याख्या ठरेल ‘धी इमिटेशन गेम’ इमिटेशन म्हणजे ‘भासविणे’ आणि अगदी लेखाच्या सुरुवातीस जो शब्द योजला होता ‘आभासी माध्यम’, किंबहुना अगदी अगदी आभासी सत्यापर्यंत ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’पर्यंत ह्या गोष्टी जातात.

दुर्दैवाची गोष्ट इतकीच की अ‍ॅलनवर पाश्चिमात्य लोकांना आत्ता चित्रपट काढावासा वाटतोय, पण आपल्या मराठी वाचकांना हा अ‍ॅलन कोण हेदेखील माहित नाही, त्याच्यावर मराठीत कादंबरी निघूनदेखील. नंदा खरेंनी 2007 सालीच लन ट्युरिंगवर ‘नांगरल्याविण भुई’ ही कादंबरी लिहिलेली आहे, ती आपण अवश्य वाचली पाहिजे.
‘धी इमिटेशन गेम’ चित्रपट हिंदीत.
एनिग्मा यंत्र माहिती – इंग्रजी
आता ह्या सर्वांत मराठी कुठेय?
अगदी सोप्पंय ना! भ्रमणध्वनिच्या निश्चितिकेत/( ीशींींळपसी)मध्ये जा आणि भाषेमध्ये मराठीचा पर्याय निवडा, झाला की तुमचा भ्रमणध्वनी मराठी! कृत्रीम प्रज्ञेत चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी, कोपायलट, इत्यादी अनुप्रयोगांवरही मराठीत प्रश्न विचारून उत्तरं मिळत आहेतच की! अगदी कृत्रिम प्रज्ञा वापरून कविता लिहिणं, चित्र काढणं, ध्वनिचित्रफिती तयार करणं, त्या संपादित करणं ही सगळी कामं होत आहेतच की! पण नुसतं पटलावर मराठी असून भागू शकणार असेल तर ह्या विषयाच्या उहापोहाची गरज काय? आमचा साधा कळपाटसुद्धा खपीलीळिीं आहे! तो देखील आम्हाला मराठी वापरावासा वाटत नाही! तर भाषेचा प्रश्न येतोयच कुठं? आयआयटी मुंबईतील तंत्रज्ञांनी विकसित केलेला ‘स्वरचक्र’ पूर्वी किमान गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध तरी होता. आता तर तिथूनही नाहीसा झालाय. आम्ही संगणकावर तरी कुठे ‘युनिकोड’ वापरतो? तिथेही गुगल फोनेटिक जिंदाबाद!

संकेतनात मराठी आणता येईल?
आता तुम्ही प्रश्न विचाराल की इतके खटाटोप करायची गरजच काय? इंग्रजीतून सध्या संकेतन (कोडींग) करता येतंय की! एका वेगळ्या नवीन भाषेची काय आवश्यकता आहे? केवळ देवनागरीतून कोडींग करता आलं म्हणजे इंग्रजीची मक्तेदारी मोडता आली असं होणार आहे का? तर तसं नाही. इथं प्रश्न फक्त भाषिक मक्तेदारीचा नाही. इथे प्रश्न त्या संकल्पनांचा आहे, ज्या इंग्रजीपेक्षा मातृभाषेतून अधिक सुकररित्या अवगत होऊ शकणार आहेत. उदाहारणादाखल सांगायचंच तर सध्या एक चलनी शब्द वापरला जातो, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकर्‍यांची निर्मिती झाली आहे, तो म्हणजे डएज डशरीलह एपसळपश जिींळाळूरींळेप ह्याला मराठीत अगदी सोप्पं करता येऊ शकेल की, (शोध सुकर यंत्र.) पण आम्हाला तो वापरण्याजोगा वाटतो का?
दुसरं म्हणजे केवळ भाषांतर करण्याने इप्सित साध्य होण्यासारखे नाही! हे म्हणजे बर्गरला वडापाव म्हणण्यासारखे किंवा पिझ्झाला मसाला पोळी म्हणण्यासारखे झाले. त्या मूलभूत संकल्पानांचा मातृभाषेतून अभ्यास व संज्ञांना पर्यायी मराठी प्रतिशब्द योजले जाणे हा प्रयत्न असला पाहिजे. अगदी टोकाचा नसावा की प्रत्येक शब्द आलाच पाहिजे, पण निदान मूलभूत संकल्पना तरी नकोत का? ह्या सर्व तंत्रज्ञानाची ज्ञानपरंपरा ही पाश्चिमात्य जगतात विकसित झाली असली तरी ती भारतात पुढे विकसित होऊ शकत नाही का? तर असं मुळीच नाही. पण त्यासाठी खोलात संशोधन करण्याची वृत्ती लागणार आहे.

धोरण कसं ठरवावं?
सर्वप्रथम ह्या नवीन भाषेचे प्राज्ञापन (झीेसीरााळपस) सध्या ज्या भाषा संकेतनासाठी (उेवळपससाठी) वापरल्या जातात त्या भाषांमधील अभाव लक्षात घेऊन ह्या भाषेची निर्मिती करण्यात काहीतरी तथ्य आहे. ही भाषा जर भविष्यातील पिढ्यांनी वापरायची वा स्वीकारायची असेल तर ह्या भाषेचे काय वेगळेपण आहे ते अधोरेखित होणं जास्त महत्त्वाचं वाटतं. सध्या ज्या भाषा वापरल्या जातात त्यातला माझ्या अभ्यासात जो प्रकर्षाने निदर्शनास आला तो अभाव म्हणजे जसं काम तशी भाषा. म्हणजे समजा संकेतस्थळ (ुशलीळींश) बनवायचं असेल तर वेगळी भाषा वापरावी लागते, ती भाषा अनुप्रयोग (रिि) बनवायला चालेलच असं नाही, जी भाषा अनुप्रयोग निर्मितीसाठी वापरली जाते ती भाषा विदा संचनासाठी (ऊरींर इरीश)साठी वापरता येईल असं काही नाही, तसंच भ्रमणध्वनी बनवणे, चिपतंत्रज्ञानासाठी वेगळ्यापद्धतीच्या भाषांमधून प्राज्ञापन केले जाते. ही जर का मराठीतून अशी कोणती भाषा बनवायचीच असेल तर तीत हा प्रयत्न नक्की केला गेला पाहिजे की ती सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या प्रक्रियांमध्ये वापरात आणता येईल. म्हणजे ती एकच भाषा संकेतस्थळ, अनुप्रयोग निर्मिती इत्यादींची कामे करू शकेल तेव्हाच काय तो तिचा उपयोग.

2019साली अमेरिकेत पिट्सबर्गमधल्या कार्नेगी मेलन विद्यापीठात शिकत असणार्‍या एका विद्यार्थ्याने प्राचीन चिनी लिपीचा वापर करत एक साचेबद्ध (उेाळिश्रशी) भाषा बनवली तिचं नाव वेनयान लँग, थशपूरप-श्ररपस. त्या विद्यार्थ्याचं नाव लिंगदाँग ह्युआंग. अशी भाषा चीन आत्ता आत्ता वापरतय असं मुळीच नाही. त्याही उलट अंकीय जगतातला सर्वांत मोठा संघर्ष, बोलायचंच झालं तर ऊळसळींरश्र जगातला सर्वात मोठा संघर्ष हा Aपवीेळव आणि Aिश्रिश ह्यांच्यामध्ये विदेच्या (ऊरींर) सुरक्षिततेच्या प्रश्नावरून आहे. भविष्यकाळात ही फार मोठी चिंतेची बाब ठरण्याची लक्षणं असली तरी आपण भारतीयांना फारच उशीर झाला आहे असं म्हणण्याची जरूर नाही!

भाषेची निर्मिती करण्यासाठी ह्या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी मराठी ‘भाषे’च्या अभ्यासकांसोबत मिळून एक प्रकल्प हाती घेणं गरजेचं आहे. ज्यात आज्ञावल्या कशा असाव्यात, प्राज्ञापन सुकर कसे करता येईल, रचना डूपींरु कसे सांभाळता येईल असे तांत्रिक भाग पाहावे लागतील. ह्यासाठी मोठ्या स्तरावर परिश्रम घेणं गरजेचं आहे. भाषा निर्माण झाल्यानंतर ती वापरणार कोण हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही! सध्या तरी कुणीच नाही! हे अगदी ठाम उत्तर. जिथे मराठी शाळाच बंद पडत आहेत तिथे ह्या भाषेचा वापर कोण का करील? म्हणूनच ही भाषा इतर आत्ता उपलब्ध असलेल्या भाषांचा अभ्यास करून बनवलेली असेल तर नक्कीच ती उपयोगाची ठरेल. (तसं पाहायला गेलं तर अद्याप अशी भाषा देवनागरीतून आलेली नाही, हे ह्या नवीन भाषेच्या पथ्यावरच पडेल.) ही भाषा वापरणारा वर्ग तयार करण्यासाठी आतापासूनच मुलांना माहिती व तंत्रज्ञानाचं शिक्षण मराठीतून देणं आवश्यक आहे व सर्वप्रथम जे इंग्रजीतून शिकून तयार झालेले आहेत त्यांनी मराठीतून हा विषय समजल्यास त्यांनाही अधिक प्रगल्भता येण्याची चिन्ह आहेत!

अजूनही संकेतनाच्या (उेवळपस) बाबतीत आपण दुसर्‍याच्या ओंजळीतून पाणी पित आहोत असंच म्हणावं लागेल. हे तंत्रज्ञान इंग्रजीतून विकसित झालं, कारण ते पाश्चिमात्यांनी निर्माण केलं, तशी तिथे ज्ञानपरंपरा व कुतूहल होते. भारतीयांनी इंग्रजांचे शंभर दोष काढले तरी साहेबाचा चिकित्सक कुतूहलाचा गुण काही आम्ही घेतला नाही. आपण आळस सोडून आणि शुद्ध मराठीत रिीीळेपरींश्रशू (आवडीने) हे काम केल्यास यातून मोठ्या प्रमाणावर उद्योग तयार करता येतो. स्टीव्ह जॉब्स व इतर अमेरिकी उद्योगपतींनी हे वारंवार सिद्ध केलेले आहे. विशेष करून त्यांनी, ज्यांना मराठीबद्दल हळहळ वाटते. नुसती भावनिक हळहळ उपयोगाची नाही, त्याला तर्कसुसंगत अशी विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड असणं गरजेचं आहे. हे काम पिढ्यानपिढ्यांचं काम असणार आहे, तेव्हां कुठे तरी जाऊन आम्ही खऊए विकसित करू शकू.

खऊए म्हणजे काय रे भाऊ?
आताच आपण जी चर्चा केली की, हे वापरणार कोण? सध्या ज्या ह्या भाषा वापरल्या जातात त्यांचं प्राज्ञापन हे खपींशसीरींशव ऊर्शींशश्रेिाशपीं एर्पींळीेपाशपींीच्या माध्यमातून होत असतं. थोडक्यात मराठीत काय, तर विकासांतर्भूत परिसराची निर्मिती. एखादी भाषा असली की तिची लायब्ररी ही असते, त्यासाठी मोठमोठ्या विदा साठवणार्‍या कोठारांची अर्थात शुद्ध मराठीत डींेीरसश र्केीीशीची निर्मितीही करावी लागणार. त्यापाठोपाठ ते वापरणार्‍यांचं जाळंही निर्माण होईल. तुम्ही म्हणाल, इतकी छान भाषा काढताय तर ती केवळ मराठी भाषकांनाच वापरता येईल? समजा परदेशी माणसाला ही येत नसेल तर तो प्राज्ञापन कसं करणार? इथेच तर व्यापार सुरू होतो नाही का? एका उदाहरणात समजू या. मला जर दीरू रिपोर्ट किंवा चठख रिपोर्ट इंग्रजी येत नसेल तर वाचता येत नाही तर मग हाच न्याय अनुसरून समोरचा इंग्रजी माणूस त्याला ह्या भाषेत प्राज्ञापन करायचे असेल तर मराठी शिकावं लागेल. ह्याला ज्यांना भाषिक राजकारण म्हणायचं असेल ते म्हणू शकतात पण ते चुकीचे आहे असे वाटण्याचे कारण नाही. कोणतीही भाषा शिकण्यासाठी गरज निर्माण व्हावी लागते आणि तशीच ती गरज ह्या संबंधाने निर्माण होत असेल तर त्यात चूक ती काय? ह्या बाबतीत आपण सर्वंच भाषकांनी पुढाकार घेणे गरजेचे नाही का? किमान प्रतिशब्द निर्माण करण्यासाठी आपण आपल्या बोलींचा वापरही करूच शकतोय, तो न टाळता केला गेला पाहिजे आणि प्रमाणिकरणाची वाट न पाहता विचारपूर्वकपणे, विवेकाने, सजगपणे तो वापर केला पाहिजे.

हे सर्व एक स्वप्निल चित्रण वाटू शकेलही पण हे स्वप्न आहे स्वत:च्या भाषेत शिकण्याचं. स्वप्निल असणं चुकीचे असेल पण स्वप्न पाहणं मुळीच चुकीचं नाही. हेच स्वप्न रिस्टॉटलनेही पाहिलं, गॅलिलिओनेही पाहिलं, लन ट्युरिंगचं स्वप्न ही असंच होतं आणि आपणही ते पाहायला हवं. अशा स्वप्नातून नवीन प्रश्न पडायला हवेत आणि प्रश्नांच्या कवडश्यातून नवीन प्रश्नांचं वेध घेणंच क्रमप्राप्त ठरतं, उत्तरं असतातच. ती मिळत जातात. सध्याचा सर्वात मोठ्ठा प्रश्न मराठी भाषक समाज, हा भाषेचा बेगडी अभिमान सोडून तर्कसंगतपणे भाषा जपणार आहे की ज्ञानेश्वरीपासून तुकारामांपर्यंतच्या समृद्ध वारशातच रममाण राहून ठेविले अनंते काहीही न करता राहावे ह्या आत्ममग्न गौरवात धन्यता मानत राहणार आहे? हा एक निराळाच पेचप्रश्न आहे. भाषांतराचा काळ तोपर्यंत जाणार नाही, जोपर्यंत भारत स्वत:च्या पायावर वैज्ञानिक तर्कशुद्ध शोध लावेल.

(हा लेख लिहिण्यासाठी संकेतनिका (लेवशी) उर्मिला राजापूरकर यांनी मदत केली आहे.)

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech