आयपीएलची बादशाही धोक्यात? श्रीमंतीत नंबर १, पण मानांकनात तिसऱ्या स्थानी!

0

जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून असलेला लौकिक इंडियन प्रिमिअर लीगने जगभरात कायम राखला आहे. पण, त्याचवेळी दोन निकषांमध्ये कमी पडल्यामुळे क्रिकेटपटूंच्या जागतिक संघटनेनं दिलेल्या मानांकनात आयपीएल तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. गुरुवारी डब्ल्यूसीएनं ही क्रमवारी जाहीर केली आहे. आणि यात द हंड्रेड ही इंग्लंडमधील लीग तसंच एसए२० ही दक्षिण आफ्रिकेतील लीग अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

डब्ल्यूसीएच्या अहवालानुसार, आयपीएलला खेळाडूंचे सरासरी पगार आणि पगाराची खात्री यासाठी जास्तीत जास्त गुण मिळाले, मात्र आयोजनाचा अधिकार आणि “विवाद निवारण” या बाबतीत खेळाडूंनी दिलेलं रँकिंग कमी पडल्यामुळे लीगच्या यादीत सर्वोच्च स्थान आयपीएलला मिळवता आलं नाही. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश आणि पाकिस्तान सुपर लीग या लीग पहिल्या पाचांत आहेत.

खेळाडूंच्या जागतिक संघटनेनं दिलेली क्रमवारी
१. द हंड्रेड – ७५.२
२. एसए२० – ६८
३. आयपीएल – ६२.६
४. बीबीएल – ६२.५
५ पीएसएल – ४८
एमएलसी – ४३
आयएलटी२० – ३९.१
सीपीएल – ३८.९
आबूधाबी टी१० – ३०.१
बीपीएल – २२.६

डब्ल्यूसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम मोफॅट यांनी सांगितले की, “स्थानिक लीगमुळे खेळाला जागतिक पातळीवर फायदा झाला आहे, पण खेळाडूंच्या हितसंबंधांची आणि कल्याणाची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक लीगशी संपर्क साधून सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यासाठी कार्यरत आहोत,” असं डब्ल्यूसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम मोफॅट यांनी म्हटलं आहे.

मोफॅट यांनी असेही स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर नियंत्रित मानकांचा अभाव असल्यामुळे, डब्ल्यूसीए लीग हब तयार करून एकत्रित बेंचमार्किंग करत आहे, यातून लीग व्यावसायिकरित्या चांगल्या पद्धतीने चालाव्या आणि खेळाडूंना संरक्षण मिळावं याचा पाठपुरावा शक्य होईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech