अस्पर्शित ५ भारतीय पर्यटनस्थळे

0
छोट्यामोठ्या सुट्टयांमध्ये आपण कुठे ना कुठे पर्यटन करण्याचा प्लान करतो. प्रत्येकवेळी फार पैसे खर्च करून विदेशातच जायला हवे; असे नाही. आपल्या आसपासच्या राज्यांमध्येसुद्धा अशी काही पर्यटनस्थळे आहेत; जी आपल्याला खूप आनंद देऊन जातात. गरज आहे; अशी अस्पर्शित ठिकाणे शोधण्याची आणि तिथपर्यंत पोहोचण्याची! क्लब महिंद्रा आपला वेगळ्या वाटेवरचा वाटाड्या ठरतोय…

भारतात भरपूर वैविध्य आहे आणि बहुतांश भाग अद्याप उत्सुक पर्यटकांनीही पाहिलेला नाही. उत्तुंग पहाडांपासून ते सुरेख तळी आणि घनदाट अरण्यांपर्यंत अनेक ऑफबीट  ठिकाणे प्रवाशांची वाट पाहत आहेत.
बैगुनी (सिक्कीम)  : बैगुनी हा सिक्कीमच्या पश्चिमेकडील सुंदर डोंगराळ भाग आहे. कांचनजुंगा येथे सूर्योदय पाहता येईल, येथे पक्षी आणि तळ्यांचे सौंदर्य न्याहाळता येईल, बैगुनीमध्ये निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे. पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग,माउंटेन कँपिंग, व्हिलेज ट्रेकिंग यासारख्या अनेक गोष्टी येथील वास्तव्यात करता येतील.
बिनसर (उत्तराखंड) : वन्यजीवप्रेमींसाठी बिनसर म्हणजे स्वर्गच. बिनसर हे वन्य जीवांचे घरच आहे. येथे हरणं, जंगली बोकड, उडत्या खारी आणि इतर अनेक दुर्मीळ प्राणी राहतात. बिनसरमध्ये पंच्चुली, शिवलिंग, चौखांबा, त्रिशुल आणि नंदादेवी असा 300 किमीचा पॅनोरॅमिक व्ह्यू आहे. येथे तुम्ही भटकंती, गावातील भटकंती, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षण आदी गोष्टी करू शकता.
पूवर (केरळ) : नदीच्या रूंद मुखासह असलेले हे बेट आहे. पूवर म्हणजे केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्यातील स्वर्गच आहे. पूवरला नेय्यरचा वेढा आहे. त्रिवेंद्रमजवळील अगस्तीयरकूदमचे मूळ आणि अरबी समुद्रचा शेवट अशा ठिकाणी पूवर वसलेले आहे. हिरवी नारळाची झाडे आणि सोनेरी वाळू यांनी नेय्यर नदीचा परिसर सुरेख दिसतो. येथील बॅकवॉटर क्रूज म्हणजे अप्रतिम सौंदर्याची खाणच होय.
मदिकेरी (कर्नाटक) :  कूर्ग (कोडागु) जिल्ह्यात मुख्यालय असलेले हे हिल स्टेशन आहे. मदिकेरी हे कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाण आहे, डोंगररांगा, हिरवीगार शेतं, कॉफीची शेती आणि केशरी ऑर्चड म्हणजे पर्वणीच. येथील नदीचे खळाळते पाणी म्हणजे निसर्गदत्त देणगीच. एबी धबधबा, मंडालपट्टी, छेलावारा धबधबा, कोटेबेट्टा यासारखी सुंदर प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.
कुंभलगढ (राजस्थान) : कुंभलगढपेक्षा अधिक चांगलं ते काय असू शकतं! महाराजांची रॉयललाइफ पाहण्याची ही एक संधी आहे. राजस्थानातील राजसअमंद जिल्ह्यातील हे शहर म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. कुंभलगढ ही फोटोग्राफर्ससाठी आणि  वन्यजीवप्रेमींसाठी उत्तम जागा आहे. कुंभलगढ किल्ला ३६ किमीचा आहे आणि राजस्थानातील सर्वात महत्त्वाचा व दुसऱ्या क्रमांकावरील किल्ला आहे. आणि ही जगातील सर्वात मोठी भिंत आहे. कुंभलगढ़ वन्यजीवसँक्च्युअरी, बादल महार, मम्मादेव मंदिर ही ह्या शहरातील इतर आकर्षणस्थळे आहेत.
सध्याच्या एक्सप्लोअर्ड आणि अनएक्सप्लोअर्डबद्दल महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेड (एमएचआरआयएल)चे प्रमुख वितरण अधिकारी गिरिधर सिथाराम म्हणाले की, `अनएक्सप्लोअर्ड ठिकाणी प्रवास करण्यात आज भारतीयांना स्वारस्य वाटू लागले आहे आणि ते वाढते आहे, यात त्यांचे पर्याय प्रायोगिक स्तरावरील आहेत. त्यांना अनोख्या प्रवासाचा अनुभव मिळत असेल तर तो त्यांना हवा आहे. आम्ही क्लब महिंद्राने नेहमीच प्रत्येक कुटुंबाची सुट्टी विविध अनुभवांनी भरलेली राहील आणि नेहमीपेक्षा वेगळी राहील याची खात्री बाळगलेली आहे. भारतात अनेक ठिकाणी आमची मालमत्ता आहे. उत्तराखंडमधील बिनसर व्हॅली, केरळमधील पूवर येथील क्लब महिंद्रा, राजस्थानातील कुंभलगढ येथील क्लब महिंद्रा ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.”

Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech