दहावीनंतर तंत्रशिक्षण : करियरचा उत्तम पर्याय

0
दहावी परीक्षेच्या निकालांमध्ये अनेक मुलांना अपेक्षित यश मिळत नाही. ते जेमतेम पास होतात. एक वर्ष तर वाचते पण पुढे काय? हा प्रश्न अधिक गंभीर होतो. विशेषकरून आर्थिकदृष्ट्या ज्या कुटुंबाची परिस्थिती कमकुवत असते अश्या कुटुंबातील मुलामुलींना पुढील शिक्षण आणि कुटुंबासाठी नोकरीस लागणे ह्या दोन्ही गोष्टींचे भान राखावेच लागते. उच्च शिक्षण, पदवीअभ्यासक्रम हे करावेसे वाटतात पण परिस्थिती अनुकूल असतेच असे नाही. अशा वेळी ‘तंत्रशिक्षण’ हा पर्याय खूप चांगला उपयोगी पडतो.
अनेक व्यवसायांमध्ये पुस्तकी ज्ञानाधारित पदवीधारकांपेक्षा तांत्रिक बाबी, ज्ञान असणारे ‘कौशल्यधारक’ यांची मोठीच गरज भासते. दुर्दैवाने आपल्या येथील नोकरी-प्रतिष्ठा प्रणाली ही तंत्र-कौशल्यधारकांना त्यांचे मुल्य ओळखू न शकल्याने काहीशी दुर्लक्षित करत आली आहे. पण हे सगळीकडेच होते असे नाही. त्यामुळे जर दहावीनंतर एखाद्याला लगेचच नोकरी करणे आवश्यक असेल तर तंत्रशिक्षण हाच पर्याय त्यासाठी योग्य आहे.
शासनाच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे अशा तंत्र शिक्षणाधारित कमी कालावधीच्या अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. मुंबईतील अलीयावर जंग मार्ग, खेरवाडी, वांद्रे येथील तंत्र शिक्षण संस्थेत फक्त सहा, ( हो केवळ 6), आठवड्यात शिकवला जाणारा IBMS म्हणजेच ‘इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम्स’ हा अभ्यासवर्गही असाच एक.
आज अनेक महानगरातून अनेक लहान मोठे गृहनिर्माण प्रोजेक्ट्स तयार होत आहेत. ह्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये बिल्डिंग व्यवस्थापन जाणणारा कुशल तंत्रज्ञ असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही संधी मिळवणे ह्या IBMS अभ्यासक्रमामुळे शक्य होते. ह्या IBMS अभ्यासक्रमवर्गात इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व अत्याधुनिक इमारत ऑटोमेशन सिस्टिम्स ह्या तांत्रिक बाबीवर आधारित ६ आठवड्यात ६ वेगवेगळ्या कौशल्यांचे ज्ञान दिले जाते. जसे की,
Introduction of Integrated building management systems, residential based security systems & study of building management systems control room. (इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम्सची ओळख, निवासी आधारित सुरक्षाव्यवस्था आणि बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम कंट्रोल रूमचा अभ्यास)
Closed circuit television surveillance systems (CCTV)
(बंद सर्किट पाळत प्रणाली, सी सी टी व्ही)
Access control automatic electronic door locking systems.
(स्वयंचलित नियंत्रित इलेक्ट्रॉनिक दरवाजा लॉकिंग सिस्टिम)
Public addressable systems.
(जाहीर सूचना प्रणाली )
Fire alarm systems.
(अग्नी सूचना प्रणाली)
Heat ventilation & air conditioning systems.
(उष्णतेचे वायुविजन आणि वातानुकूलन प्रणाली)
Emergency integrated buidling management systems & control.
(आपात्कालीन एकीकृत बिल्डिंग व्यवस्थापन प्रणाली आणि नियंत्रण )
ह्या साऱ्या तंत्रकौशल्यांची माहिती घेऊन हा अभ्रासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय तंत्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या सहीचे अधिकृत असे प्रमाणपत्र दिले जाते. ज्यामुळे  पुढे त्या विद्यार्थ्याला शासकीय आस्थापना, शासकीय कार्यालये, नगरपालिका-महानगरपालिकांची कार्यालये, इतर खाजगी कार्यालये, ऑफिसेस, फॅक्टरीज, उद्योग प्रीमाईसेस इत्यादी संस्थांमधून नोकरी मिळण्यासाठी प्राधान्य मिळते. तसेच स्वतःचा असा व्यावसायिक सल्लागार म्हणून सुद्धा व्यवसाय सुरू करणे शक्य होते.
ह्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक आणि प्रवेशसमन्वयक वैभव बाळकृष्ण विरकर हे असून ह्या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,’केवळ दहावी पास आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या पुढील भविष्याची चांगली सुरुवात करण्यासाठी हा अभ्यासक्रम एक सुसंधी आहे. आम्ही १५ते २० इतक्याच विद्यार्थ्यांची एक बॅच तयार करून त्यांना अभ्यासक्रमाचे लेखी शिक्षण, प्रात्यक्षिक, असे पूर्ण प्रशिक्षण देतो. आठवड्यातून एक दिवस (शनिवारी किंवा रविवारी) अशा रीतीने ६ आठवड्यात हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिकवला जातो. शासकीय तंत्रशिक्षण संस्था नियमांच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करते. शासकीय मान्यता मिळाली असल्याने ह्या प्रमाणपत्रामुळे नोकरी व नोकरीमध्ये बढती मिळणे, तसेच स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय चालू करणे सोपे जाते. सध्या शासकीय तंत्रशिक्षण संस्थेच्या मुंबई व पुणे अशा दोन ठिकाणी ह्या  अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालक ९१+९८२०७५४७२७ ह्या  क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
दहावीच्या परीक्षेत मिळालेले मार्क व निकाल  हेच काही अंतिम ध्येय नसते, तर ती केवळ एक पहिली पायरी असते.  तेथून पुढे अधिक मोठय़ा संधी आपली वाट पहात असतात. कमी मार्क मिळाले म्हणून निराश न होता तंत्रशिक्षणाचे असे अभ्यासक्रम तुम्हाला नेहमीच एक नवी उभारी, नवी उमेद, नवी संधी मिळवून देतात हे नक्की. गरज आहे ती अशा संधीच्या शोधात राहण्याची व त्या संधीचे सोने करण्याची.
Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech