नवरात्रीमधील वापरल्या जाणाऱ्या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणाऱ्या वारांवर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रे नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असेही नाही. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी एकाच रंगाची वस्त्रे वापरल्याने महिलांच्या मनामध्ये समानतेची, सुरक्षिततेची आणि एकतेची भावना निर्माण होते. शिवाय ठरावीक दिवशी ठरावीक रंगाची वस्त्रे नेसल्याने आनंदप्राप्तीही होत असते. नवरात्रात आदिशक्तीची, निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ ह्या संख्येचे दृढ नाते आहे. बी जमिनीत रुजत घातल्यानंतर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणून नवरात्र नऊ दिवसांचे असते. नऊ ह्या संख्येला ‘ब्रह्म संख्या‘ म्हणतात. सर्वांत मोठा अंक नऊ हाच आहे. आश्विन महिन्यात शेतातील धान्य तयार होऊन घरात येते. म्हणून नवरात्रामध्ये आपण ह्या निर्मितीशक्तीची पूजा करीत असतो. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. निर्मितीशक्ती हीच विश्वातील आदिशक्ती आहे.
ह्या वर्षी घटस्थापना म्हणजेच नवरात्रारंभ बुधवार, दि. १० आक्टोबर रोजी सुरू होत आहे. द्वितीया तिथी क्षय असून षष्ठी तिथीची वृद्धी झाली आहे. ललिता पंचमी शनिवार, १३ आक्टोबर रोजी आहे. बुधवार, दि. १७ आक्टोबर रोजी महाष्टमी व महानवमीचे उपवास आहेत. गुरुवार, दि. १८ आक्टोबर रोजी अपराण्हकाली दशमी असल्याने त्याच दिवशी विजया दशमी-दसरा सण साजरा करावयाचा आहे; तसेच नवरात्रोत्थापनही आहे.

यावर्षीच्या नवरात्रामधील नऊ रंग पुढीलप्रमाणे आहेत.
- बुधवार , दि. १० आक्टोबर (निळा)
- गुरुवार, दि. ११ आक्टोबर (पिवळा)
- शुक्रवार, दि. १२ आक्टोबर (हिरवा)
- शनिवार, दि. १३ आक्टोबर (ग्रे)
- रविवार, दि. १४ आक्टोबर (केशरी)
- सोमवार, दि. १५ आक्टोबर (सफेद)
- मंगळवार , दि. १६ आक्टोबर (लाल)
- बुधवार, दि. १७ आक्टोबर (जांभळा)
-
गुरुवार , दि. १८ आक्टोबर (गुलाबी)