शहाळे व काजुची भाजी

0

साहित्य (4 जणांसाठी) :

शहाळ्यातील कोवळे खोबरे तीन कप, काजू 30, तेल 4 टेबल स्पून, पातीचा कांदा बारीक चिरलेला 3 कप, टॉमेटो बारीक चिरलेला एक मोठा, आले-लसूण पेस्ट 1 टी स्पून, हळद अर्धा टी स्पून, लाल तिखट 1 टी स्पून, गरम मसाला पावडर 1 टेबल स्पून, टॉमेटो कॅचअप 2 टेबल स्पून, कोंथिबीर 2 टेबल स्पून, मीठ चवीनुसार.

कृती:

शहाळ्यातील खोबर्‍याच्या 2 इंच लांबीच्या पट्ट्या (तुकडे) कापून बाजूला ठेवाव्यात. काजू पाण्यात भिजत घालावे. एका कढईत तेल गरम करून पातीचा कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा. नंतर टॉमेटो घालून मऊ होईपर्यंत शिजवावा. खोबर्‍याच्या पट्ट्या व काजू घालून दोन मिनिटे परतावे. पुढे आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि अर्धा कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. नंतर मीठ व टॉमेटो कॅचअप घालून नीट ढवळावे. कोंथिबीर घालून भाजी सजवावी आणि गरमागरम खायला द्यावी.

Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech