लॉकडाऊनमुळे सद्या सगळ्यांच्याच हाताशी भरपूर वेळ आहे. ह्या वेळात आपण काही हटके रेसिपीज ट्राय करून पाहू शकतो. ‘प्रयोगांति चमचमीत’ सिद्ध झालेल्या ह्या काही पाककृती घरच्याघरी करून पाहा.
1. बनाना चॉकोलेटे केक साहित्य : २ केळी, १८० ग्रॅम साखर, १२० मिली तेल, १ टी स्पून व्हॅनिला एसेन्स, १ टी स्पून व्हिनेगर, १२० मिली पाणी, १ १/२ कप मैदा, १/२ कप कोको पावडर, १ टी स्पून बेकिंग पावडर, १ टी स्पून बेकिंग सोडा, १/४ टी स्पून मीठ, १/४ कप आक्रोड
कृती : केळ्यांचे तुकडे, साखर मिक्सरमधून वाटून घ्यावं. एका बौलमध्ये केळ्याचं मिश्रण घ्यावं, त्यात तेल, व्हॅनिला इसेन्स, व्हिनेगर, घालून एकजीव करून घ्यावं. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावं .पाणी घालून मिश्रण तयार करावं .आक्रोडचे तुकडे घालून एकत्र करावे .एका बेकिंग ट्रेला तेल लावून वरील मिश्रण त्यात घालावे व वरून डार्क चॉकोलेटे घालून घ्यावे. ओव्हनला १८० डीग्रीवर ३०-३५ मिनिटे बेक करून घ्यावा.

2. चॉकोलेटे फज साहित्य : डार्क चॉकोलेटे २०० ग्रॅम, मिल्कमेड १५० ग्रॅम, बटर ५० ग्रॅम
कृती : एका नॉनस्टीक पॅनमध्ये बटर आणि मिल्कमेड एकत्र करून लो फ्लेमेवर वितळवून घ्यावे. ह्या मिश्रणात चॉकोलेटचे तुकडे घालावेत .चॉकोलेटचे तुकडे एकत्र होईपर्यंत सतत हलवत राहावे. एका बेकिंग ट्रेला तेल लावून वरील मिश्रण त्यात घालून सगळीकडे समांतर पसरवून घ्यावे. हे मिश्रण एक तास फ्रिजमधे ठेवावे व नंतर चौकोनी आकारात कापून सर्व्ह करावे.

3. डालगोना कॉफी साहित्य : कॉफी पावडर ३ टी स्पून, साखर ३ टी स्पून, दूध ३०० मिली, पाणी १ १/२ टी स्पून
कृती : कॉफी पावडर, साखर, पाणी एकत्र करून ब्लेंडरच्या साहाय्याने ७-८ मिनिटे हाय स्पीडवर फेटावे .दुधाला मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. कपमध्ये प्रथम दूध घालून त्यावर कॉफीचे मिस्क घालावे. वर कॉफी पावडर घालून गरमागरम सर्व्ह करावी.

4. बसबुसा साहित्य : रवा १ १/२ कप, डेसीकेटेड कोकोनट १/२ कप, कॅस्टर शुगर १/२ कप, तेल ८० मिली, बेकिंग पावडर १/२ टी स्पून, बेकिंग सोडा १/२ टी स्पून, दूध १ कप
कृती : एका बौलमध्ये रवा,कोकोनट,साखर एकत्र करून घ्यावे. हळूहळू त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .तयार मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. एका बेकिंग ट्रेला तेल लावून बटर पेपर लावून वरील मिश्रण त्यात सगळीकडे पसरवावे. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १८० डीग्रीवर ३० मिनिटे बेक करून घ्यावा.

5. कॅरेट चीज पिझ्झा साहित्य : मायोनीज १/२ कप, शेझवान चटणी १/२ कप,टोमॅटो सॉस २ टेबलस्पून, ओरेगॅनो १ टेबलस्पून, चिलीफ्लेक्स १ टेबलस्पून, चीज, किसलेले गाजर १ १/२ कप, बारीक चिरलेला कांदा १ कप, बारीक चिरलेला टोमॅटो १ कप, पिझ्झा बेस ६
कृती : एका भांड्यात गाजर, कांदा, टोमॅटो एकत्र करून घ्यावे. त्यात मायोनीज, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस एकत्र करून घ्यावे. पिझ्झा बेसला वरील सॉस लावून भाज्यांचे मिश्रण पसरवून घ्यावे व त्यावर चिलीफ्लॅक्स, ओरेगॅनो घालून त्यावर चीज किसून घ्यावे. तव्यावर खरपूस भाजून घ्यावा.