लॉक डाऊनमध्ये प्रत्येकजण काही ना काही नवनवे करण्याच्या उद्योगात रमलेला आहे.अशा नव्या गोष्टींचे आपण स्वागत देखील करतो आहोत.अनपेक्षितपणे हाताशी आलेल्या वेळात तयार झालेल्या ह्या आहेत काही स्वादिष्ट पाककृती…
बेसन बटर पिझ्झा
साहित्य : बेसन १ वाटी, तांदळाचे पीठ २ चमचे, १ छोटा कांदा चिरलेला, गरम मसाला १ चमचा, धणे पूड १ चमचा, जिरे पूड १ चमचा, चाट मसाला १ छोटा चमचा, चीज २ क्यूब, मीठ चवीनुसार.
कृती : बेसन, कांदा, जिरे, धने पावडर चाट मसाला आणि मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात दीड कप पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घालून मिश्रण बनवून घ्यावे. या सर्व मिश्रणाचे फ्रायपॅनवर ३ इंच आकाराचे पिझ्झा बेस बनवून घ्यावेत. (साधारण ८-१० पिझ्झा बेस बनतात) हे पिझ्झा बेस दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत. नंतर त्यावर चीझ किसून घालावा. सर्व्ह करताना सोबत चटणी वा सॉस द्यावा.
पायनॅपल श्रीखंड
साहित्य : अर्धा किलो चक्का, पाव किलो पिठी साखर, १ वाटी पायनॅपल पल्प, २ चमचे पायनॅपल सिरप
कृती : खवा व्यवस्थित घोटून घ्यावा. (हलका होईपर्यंत घोटावा) त्यात पाव किलो पिठीसाखर घालून पुन्हा घोटून घ्यावा. नंतर त्यात पल्प घालून सर्वं मिश्रण ४ तास फ्रिजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना वरून पायनॅपल सिरप घालावा.

वॉटरमेलन आईस्क्रीम
साहित्य : अर्धा किलो कलिंगडाचे तुकडे, १०० ग्राम साखर, २०० ग्राम कंडेन्स्ड मिल्क
कृती : कलिंगड, १ वाटी पाणी, साखर घालून मंद आंचेवर एका पॅनमध्ये शिजवून घ्यावे. नंतर त्यातील पाणी काढून थंड झाल्यावर कलिंगड मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. नंतर तो रस गाळून घ्यावा. मंद आंचेवर एका पॅनमध्ये तो रस अर्धा होईपर्यंत शिजवून घ्यावा. तो रस थंड झाल्यावर कंडेन्स्ड मिल्कसह मिक्सरमधून एकजीव करून घ्यावा. सदर मिश्रण एअरटाइट कंटेनरमध्ये घालावे. कंटेनरला प्लास्टिक पेपर लावून झाकण लावून बंद करून फ्रिजरमध्ये ६ तास ठेवावे. त्यानंतर पुन्हा ते मिश्रण मिक्सरमधून फिरवून वरीलप्रमाणेच एअरटाइट कंटेनरमध्ये भरून (प्लास्टिक पेपर लावून) ६ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवावे. नंतर काचेच्या बौलमध्ये सर्व्ह करावे.