क्रिकेटपटू मोहम्मद शमी सध्या चांगलाच प्रकाशझोतात आलाय. म्हणजे, जबरदस्त बॉलर म्हणून तसा तो नेहमीच प्रकाशझोतात असतोच. पण सध्या तो क्रिकेटेतर कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. आपला जीव धोक्यात असल्याचं तर तिनं म्हटलंच आहे. पण नवरा भ्रष्टाचारी असल्याचाही आरोप तिने केल्याने शमी चांगलाच अडचणीत आलाय. त्याचं भारतीय संघासोबत राहण्याचं वार्षिक कंत्राट अंधातरी आहे. साहजिकच, चौकशी पूर्ण होईपर्यंत आता तो भारतीय संघात दिसणारही नाही. आता पत्नीला त्यानं खरंच त्रास दिलाय का, तिनं केलेल्या आरोपांत काही तथ्य आहे का वगैरे गोष्टी स्पष्ट होतीलच यथावकाश. पण, घरच्या गोष्टींची लक्तरं अशी वेशीवर टांगली जाणं अनेकांना आवडणार नाही, हेही तितकंच खरं.
शमी प्रकरणावरून अशीच आठवण होतेय, प्रेमासारखी नाजूक गोष्ट गावगप्पांचा विषय झालेल्या क्रिकेटपटूंची… सगळ्यात नवं प्रकरण म्हणाल तर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं आणि सर्वात जुनं म्हणाल (आठवणीतलं) तर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ताचं…
भारताचा अत्यंत यशस्वी कर्णधार ठरण्याकडे घोडदौड करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं अफेअर खमंग चर्चांचा विषय ठरलं. सोशल मीडियावरही ह्या दोघांतल्या केमिस्ट्रीनं धुमाकूळ घातला. कोहलीनं जबरदस्त धुलाई केल्यावर समोरच्या टीममधल्या बोलर्सनी अनुष्काभाभीला काय सांगितलं, भाभीचा राग आमच्यावर का काढतो असं विचारलं वगैरे वगैरे जोक्स कोहलीने केलेल्या धावांपेक्षा जास्त संख्येने फॉरवर्ड झाले असतील. मग त्यांचं ब्रेक-अप झाल्याच्या चर्चांनीही जोर धरला आणि हे सगळं प्रकरण ह्या दोघांनी इटलीत जाऊन लगीन लावल्याच्या बातम्यांनी, #विरूष्कानीच संपलं.
त्याआधी रंगली होती दीपिका पदुकोणच्या अफेअर्सची चर्चा. आधी युवराज सिंग, मग थेट महेंद्रसिंग धोनीशीही तिचं नाव जोडलं गेलं. धोनी आणि युवराजमधले संबंध ताणले गेलेत, त्याचं कारण दीपिकाच आहे, अशाही बातम्या आल्या. युवराजचं नाव तर नंतर किम शर्मा, प्रीती झिंटाशीही जोडलं गेलं होतं. आता युवराजनं हेझलसोबत दोनाचे चार हात केलेत, धोनी त्याच्या घरी साक्षीसोबत सुखात नांदतोय, तर दीपिकाचे हात पिवळे झाल्याची बातमी अजून तरी कानावर आलेली नाही.
ह्या दोघा फलंदाजांच्या साथीला झहीर खान, हरभजन सिंग हे गोलंदाजही होते. झहीर आणि इशा शर्वाणीच्या कथित अफेअरची चर्चा होती. भज्जी आणि गीता बसराच्या गुफ्तगूच्या बातम्याही होत्या. झहीरनं सागरिकाबरोबर आता संसार मांडलाय. हरभजनही गीतासोबत आयुष्याची इनिंग्ज खेळतोय.
भारतीय हिरॉइन्सच्या प्रेमात अन्य देशांचे क्रिकेटपटू पडल्याचेही अनेक दाखले आहेत. फलंदाजांच्या हृदयात धडकी भरवणारा पाकिस्तानी गोलंदाज वासिम अक्रमच्या दिल की धडकन विश्वसुंदरी सुश्मिता सेनने चोरल्याच्या बातम्या होत्या. त्यांची प्रेमकथाही चर्चेचा विषय ठरली होती. तर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी निकाह होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक-सायली भगत अफेअरही चर्चेत होतं.
भारतीय क्रिकेटला आक्रमक चेहरा देण्याचं श्रेय जातं, तो सौरव गांगुली प्रेमाच्या खेळपट्टीवरही चर्चेत होता. डोनासोबत त्याचं लग्न झाल्यावरही अभिनेत्री नगमाशी त्याचं नाव जोडलं जात होतं. अजय जडेजाचं नाव तर माधुरी दीक्षित, तब्बू, रवीना टंडन अशा अनेकांशी जोडले गेलं तर आणखी एक माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननं अभिनेत्री संगीता बिजलानीशी रीतसर दुसरं लग्नच केलं.
1966-67मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या सर गॅरी सोबर्स आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्या अफेअरनं माध्यमांना अनेक वर्षं खाद्य पुरवलं. नंतर सोबर्सनी ऑस्ट्रेलियातील प्रेयसीबरोबर लग्न केलं. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांच्या अफेअरचीही जोरदार चर्चा होती. मैदानात उतरल्यावर रवी मागे वळून पाहतो, ते अमृताकडेच असं अनेकांना ठामपणे वाटत होतं. रवीचा समकालीन क्रिकेटपटू संदीप पाटीलनं ‘ कभी अजनबी थे’ या सिनेमात काम केलं होतं. त्यातली एक हिरॉइन देबश्री रॉयसोबत त्याचं प्रकरण रंगल्याचीही चर्चा होती.
पण यातल्या बऱ्याच प्रकरणांत म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, असा काहीसा कारभार होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगळेपणामुळे ठळकपणे उठून दिसतं ते प्रकरण म्हणजे वेस्ट इंडिजचा रगेल क्रिकेटपटू व्हिव्हिअन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं. व्हिवचं लग्न झालंय हे माहिती असूनही त्याच्याशी उघडपणे संबंध ठेवताना नीना गुप्तानं मागेपुढे पाहिलं नाही. नीनाला व्हिवपासून एक मुलगीही झाली. 1989मध्ये जन्म झालेली मसाबा आता एक आघाडीची फॅशन डिझायनर आहे तर व्हिव आणि नीना मात्र आपापल्या जगात रमलेत.

1 Comment
Mast as usual