उन्हाळा म्हटलं की गारेगार खावंस वाटणारंच! पण ते तितकच पौष्टिकही हवंच की! म्हणूनच आपण पाहाणार आहोत उन्हाळ्यातील ‘कूल’ पूर्णान्न येथे तुमचं संपूर्ण ताट ‘कूल’ पण तितकंच टेस्टी असेल. आता या ताटात नेमकं काय असेल याची उत्सुकता वाटत असेल ना? तर या ताटात आहे दहीबुत्ती आणि लेमन राईस असे दोन प्रकारचे भात. या भातासोबत आमटी म्हणून कैरीचे रस्सम सोबत गाजराची भाजी, तोंडी लावण्यासाठी काकडीचा कायरस. स्वीट डिश म्हणून मँगो शिरा काहीतरी चटपटीत हवं म्हणून आमरस पाणीपुरी सर्वात शेवटी अमृततुल्य असे दुधीचे पियूष आणि हे सर्व पूर्णान्न ताट फस्त केल्यानंतर दिवसभरात कधीही पिण्यासाठी, उत्साहवर्धक (एनर्जेटिक) असे ताकातले रागीव्हिरा. चला तर मग करूयात उन्हाळ्यातील ‘कूल’ पूर्णान्न!
दहीबुत्ती
साहित्य : शिजवलेला भात १ मोठी वाटी, दोन वाट्या गोड दही, १ वाटी दूध, एक मोठा चमचा साजूक तूप, एक टेबलस्पून जिरे, पाच कडिलिंबाची पानं, मीठ व साखर चवीनुसार, चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर चिरलेली.
कृती : भातात दही, दूध, मीठ व साखर घालून भात नीट कालवून घ्या. गॅस सुरू करून त्यावर फोडणीसाठी ठेवा. फोडणी पात्रात एक मोठा चमचा तूप घाला. जिरे, बारीक चिरलेल्या मिरच्या, कडूलिंबाची पाने घालून नीट फोडणी करून घ्या. ही फोडणी दह्याच्या कालवलेल्या भातात घाला. वरून चिरलेली कोथिंबीर घाला. दहीबुत्ती तयार.
लेमन राईस
साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, १ टेबलस्पून चणाडाळ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, १ टेबलस्पून उडीद डाळ, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून हळद, एक मोठा चमचा लिंबाचा रस, चिमूटभर हिंग, ४-५ कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ, ४-५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर.
कृती : भात मोकळा शिजवून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा, मोहरी टाका, ती चांगली तडतडली की चणाडाळ, उडीद डाळ, हिंग, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घाला. दोन मिनिटे झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून नीट हालवून घ्या. पुन्हा एक मिनिट शिजवा. आता यात शिजवलेला भात घालून सर्व एकजीव करून घ्या. लेमन राईस तयार करून चिरलेली कोथिंबीर घाला.
कैरीचे रस्सम
साहित्य : १ वाटी कच्च्या कैरीचे तुकडे, १ चमचा उडीद डाळ, पाव चमचा मेथी पावडर, अर्धा वाटी उकडलेली तूरडाळ, अर्धा वाटी उकडलेली मूग डाळ, २ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून राई, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ ते ३ लाल सुक्या मिरच्या, १ टेबलस्पून किसलेले आले, पाव चमचा हिंग, १ टेबलस्पून सांबार पावडर, लाल तिखट आवडीनुसार, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, १५ ते २० कढीपत्त्याची पाने.
कृती : गॅसवर कढई ठेवणे, त्यात तेल टाकणे, एक टीस्पून राई टाकणे, राई तडतडली की दोन टीस्पून जिरे टाकणे, त्यानंतर हिंग कढीपत्त्याची पाने, उडिद डाळ, मेथी पावडर टाकून चांगली फोडणी करून घेणे त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, उकडलेली तूरडाळ, मूगडाळ घालून नीट मिक्स करून घेणे. किसलेले आले घालणे, आवडीनुसार लाल तिखट घालणे. पाव टीस्पून हळद घालणे. मिश्रण पुन्हा हालवून घेणे. आता यात थोडेसे पाणी घालणे कैरीचे तुकडे घालणे, सांबार मसाला घालणे सर्व एकजीव करून घेणे, मीठ घालणे, गरजेनुसार पुन्हा पाणी घालणे वर झाकण ठेवून कैरी चांगली शिजवून घेणे, कैरीचे रस्सम तयार.
गाजराची भाजी
साहित्य : चार मध्यम आकाराची गाजर धुऊन तुकडे करून घेणे. तुकडे थोडे मोठेच ठेवणे (बटाट्याच्या भाजीसाठी करतो तसे) १ मोठा चमचा तेल, फोडणीसाठी हिंग, मोहरी, १ टेबलस्पून उडदाची डाळ, दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या, ७ ते ८ कढीपत्त्याची पाने, दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा किस, चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून साखर, चवीनुसार मीठ.
कृती : कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून हिंग, कढीपत्त्याची पाने, मोहरी, उडदाची डाळ घालून फोडणी करून घ्या. त्यात सुक्या मिरच्या घाला, गाजर, हळद, मीठ, साखर घालून मिनिटभर परतून घ्या. गरज भासल्यास अगदी थोडेसे पाणी घाला, एक शिटी करून घ्या, कुकर थंड झाल्यावर नारळाचा किस, कोथिंबीर घाला. गरम गरम सर्व्ह करा.
काकडीचा कायरस
साहित्य : १ कप बारीक चिरलेली काकडी, तीन ते चार टेबलस्पून किसलेला गूळ, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हळद, आवडीनुसार लाल तिखट, चिमूटभर हिंग, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी.
कृती : एका वाडग्यात चिंचेचा कोळ घ्या, त्यात अर्धा कप पाणी घाला, गूळ, मीठ घालून मिश्रण एकजीव करा. या मिश्रणात बारीक चिरलेली काकडी घाला (किसून घेतली असेल तरी चालेल) शेंगदाण्याचा कूट घाला. मिश्रण खूपच घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घाला, मात्र अगदी पातळ करू नका. त्यानंतर फोडणीपात्रात तेल घेऊन जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करा. ही फोडणी वरील काकडीच्या मिश्रणात घाला वरून कोथिंबीर घाला. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काकडीचा कायरस तयार.
आमरस पाणीपुरी
साहित्य : १० ते १२ पाणीपुरीच्या पुऱ्या, २ कप पिकलेल्या आंब्याचा रस, ४ ते ५ बारीक चिरलेली मिरची, १ वाटी उकडलेले मूग, १ वाटी उकडलेला स्मॅश केलेला बटाटा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, दोन मोठे चमचे किसलेली कैरी, १० ते १५ पुदिन्याची चिरलेली पाने, चवीनुसार मीठ, चाट मसाला, १ मोठा चमचा तेल.
कृती : पॅनमध्ये तेल गरम करा, हिरवी मिरची, उकडलेले मूग घालून परतून घ्या. लाल मिरची पावडर घाला. उकडलेला, स्मॅश केलेला बटाटा घालून सर्व एकजीव करून घ्या. आवडीनुसार चाट मसाला घाला. आता यात किसलेली कैरी, मीठ घालून पुन्हा सर्व एकजीव करा. एका भांड्यात काढून घ्या. आता एका ग्लासात आंब्याचा रस, चिरलेली पुदिन्याची पाने, थोडासा चाट मसाला, थोडे पाणी घालून चटपटीत आमरस पाणी तयार करा. पाणीपुरीच्या पुरीत सर्व मिश्रण भरून आमरस पाणीपुरी खायला द्या.
मँगो शिरा
साहित्य : १ पेला हापूस आंब्याचा रस, १ वाटी दूध, १ वाटी रवा, १ वाटी पाणी, पाऊण वाटी साखर, बारीक चिरलेले बदाम, ३ टेबलस्पून साजूक तूप, १ टीस्पून वेलचीपूड, अर्धा टीस्पून जायफळ पावडर.
कृती : एका भांड्यात तूप गरम करून रवा भाजून घ्या, दुसर्या भांड्यात दूध व पाणी एकत्र करून एक उकळी येऊ द्या. भाजलेल्या रव्यात उकळलेले दूध-पाणी घालून मिश्रण एकजीव करा. मंद आचेवर शिऱ्याच्या गुठळ्या होऊ देऊ नका, रवा चांगला फुलला पाहिजे. यात साखर घालून नीट शिजवा, चिरलेले बादाम घाला सर्वात शेवटी आंब्याचा रस घालून पुन्हा हलवा शेवटी वेलची, जायफळ पूड घाला.
दुधीचे पियूष
साहित्य : २ मोठे पेले किसलेला दुधी, १ पेला दही, १ पेला दूध, जायफळ, तीन ते चार बर्फाचे तुकडे, दोन ते तीन चमचे केसर सिरप, २ मोठे पेले पाणी
कृती : कढईत पाणी गरम करा त्यात किसलेला दुधी घालून नीट शिजवून घ्या. थंड झाल्यावर पाणी काढून घ्या आता शिजलेल्या दुधीत बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक करा त्यात दूध, दही, साखर, १ चमचा केसर सिरप घालून पुन्हा मिक्सरला लावा दुधीचे पियूष तयार. आता हे पियूष एक ग्लासात काढून घ्या त्यात उरलेले दोन चमचे केसर सिरप जरासे जायफळ किसून घाला, घालून नीट मिक्स करा त्यात गरज वाटल्यास पुन्हा एखादा बर्फाचा तुकडा घाला थंड सर्व्ह करा.
ताकातले रागीव्हिटा
साहित्य : १ वाटी नाचणी, १ वाटी गहू, १ वाटी मूगडाळ, १ वाटी चणडाळ, दोन वाट्या ताक, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून जिरे पूड, १ कप पाणी, चवीनुसार मीठ
कृती : नाचणी, गहू, मूगडाळ, चणाडाळ सर्व एकत्र घेऊन नीट धुऊन उन्हात वाळवून घ्या. हे सर्व बारीक दळून आणून पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवा. एका लहान भांड्यात एक कप पाण्यात दोन टेबलस्पून चमचे पीठ घालून गरम करा गुठळ्या होऊ देऊ नका. पिठल्यासारखे झाले की गॅस बंद करा मिश्रण थंड झाल्यावर थंड ताकात हिंग चवीनुसार मीठ, जिरेपूड व पिठाचे मिश्रण घालून एकजीव करा. गरजेनुसार ताक वाढवा उत्साहवर्धक रागीव्हिटा तयार.