मटन चाॅप्स आणि पात्रानी मच्छी

0

मटण चॉप्स

साहित्य :
1 किलो मटणाचे चॉप्स, अर्धा किलो दही, चार चमचे लसूण-आले पेस्ट, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, चिमूटभर हिंग, दोन चमचे पाठारे-प्रभूंचा सांबर मसाला, तीन अंडी, चमचाभर काळीमिरी, एक वाटी ब्रेडक्रम्स, तेल, मीठ चवीप्रमाणे
कृती:
मटणाचे चॉप्स स्वच्छ धुवून दही, आले-लसूण पेस्ट लावून तासभर मॅरीनेट करावयास ठेवावे. नंतर त्यात हळद, तिखट, हिंग, पाठारे-प्रभूंचा सांबर मसाला, तेल व किंचीत पाणी घालून  एका भांड्यात शिजावयास ठेवावे. वाफेवर पाणी घालावे. जेणेकरून चॉप्स चांगले लवकर शिजतील. शिजायला आले की पुदीना-कोंथिबीर पेरून एक वाफ येऊ द्यावी.
थंड झाल्यावर ते चॉप्स ब्रेड क्रम्समध्ये घोळवून नंतर फेटलेल्या अंड्यात काळीमिरी मिसळून डिप करावे. आवडीप्रमाणे शॅलोफ्राय किंवा डीपफ्राय करावे. गरमागरम सर्व्ह करावे.

पात्रानी मच्छी

साहित्य :
दोन मोठी पापलेट, मूठभर पुदिना, तेवढीच कोथिंबीर, चार हिरव्या मिरच्या, एक लिंबू, मीठ चवीप्रमाणे, केळीचे पान.
कृती :
पापलेट स्वच्छ धुवून आतला काटा अलगद काढावा. पुदिना, कोथिंबीर, मीठ बारीक वाटून चटणी बनवून घ्यावी. त्यात मीठ घालून ठेवावे.
प्रथम पापलेट एका स्टीलच्या चाळणवर ठेवून गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवावेत. 10 मिनिटांनी खाली उतरवून त्यात चटणी भरावी व ते पापलेट अलगद केळीच्या पानात गुंडाळावे, पुरचुंडी सुटू नये म्हणून धागा गुंडाळावा पुन्हा ते पापलेट चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावे. अत्यंत पौष्टिक व परफेक्ट डाएट रेसिपी आहे ही! केळीच्या पानांच्या विशिष्ट सुवासाची आवड असल्यास पुदिनाच्या चटणीत लसूण, आले, हळद देखील घालू शकता.
Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech